इ.५वी साठी मराठी विषयाचे अध्यापन करताना माहितीपर उताऱ्यांचे समजपूर्वक वाचन व आकलन होणे यासाठी कोणत्या अध्यापन पद्धती वापरता येतील..?
Yogesh Vaishnav | 5 years ago
सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्थूलवाचन करू द्यावे,ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.त्यानंतर वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगावा,चित्र,तक्ते, प्रतिकृती, प्रासंगिक घटना,व्हिडीओ दाखवावेत.जसे-मुंबईत जोरदार पावसाच्या सरींनी लोकांची तारांबळ उडाली. या वाक्यात मुंबई, जोरदार, सरी, तारांबळ उडणे या शब्दांचा व वाक्प्रचारांचा अर्थ समजावून सांगितल्यास पूर्ण वाक्याचा अर्थ समजेल.अशा पद्धतीने अर्थ.विश्लेषण सांगितल्यास विद्यार्थी स्वतः देखील हळूहळू समजपूर्वक वाचन व आकलन करू लागतात.