विद्यार्थी भाषा विषयाचे लेखन करतांना ह्रस्व दिर्घ याचा विचार करत नाहीत यासाठी काय करता येईल?
Namrata Patil | 5 years ago
या चुका केवळ विद्यार्थ्यांच्याच होतात असे नाही तर मोठ्यांनाही यामधे बरेचदा संभ्रम असतो. या चुका कमी करण्यासाठी ऱ्हस्व,दिर्घ शिकवताना उच्चारातील फरक लक्षात आणून द्यावा. दिर्घ वेलांटी किंवा ऊकार असेल तर त्याचा उच्चार दिर्घ होतो. तो स्वत: करुन दाखवावा. दररोज दोन ते तीन वाक्यांचे श्रुतलेखन देऊन लेखन सरावातून या चुका कमी होतात.